शेती तुमची............. सल्ला आमचा .......शेतकऱ्यांचा एक विश्वासू तज्ज्ञ सल्लागार

शेतकरी बंधुनो.

शेतकरी कॉल सेंटर हि शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी मध्ये तसेच प्रती एकर गुणवत्ता पूर्ण शेती उत्पादन वाढीसाठी ऑनलाईन पद्धतीने अचूक सल्ला व मार्गदर्शन देणारी एक विश्वासू व तज्ञ सल्लागार स्वायत्त संस्था आहे.

शेतकरी बंधूनी आमचे सभासद का व्हावे .

 
  • शेतकरी बंधूना त्यांच्या स्थानिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून योग्य त्या पिकाची लागवडी साठी निवड करणे , त्यासाठी योग्य त्या वाणाची निवड , रोपे तयार करण्याची पद्धत किंवा तयार खात्रीशीर रोपे मिळण्याचे ठिकाण यांची माहिती, पिकासाठी आवश्यक खते, औषधे तसेच ते वापरण्याचे पिकाच्या अवस्थेनुसार प्रमाण व फवारणी तसेच खते वापराचे अचूक वेळापत्रक देणे , गरजेप्रमाणे फोनवर सल्ला व मार्गदर्शन करणे , पीक काढणी नंतर त्यावरील योग्य त्या प्रक्रियेची , मार्केटिंगची ठिकाणे व चालू बाजारभावाची माहिती देणे अशी सर्वांगीण मदत संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना करते.
  • शेतकरी बंधूना शेती साठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान , पाणीव्यवस्थापन साठी योग्य ते ड्रीप व त्याचे मान्यता प्राप्त विक्रेते यांची माहिती, सर्व प्रकारची स्टॅंडर्ड खते , औषधे , संजीवके , शेतीउपयोगी केमिकल यांची तसेच त्यांचे उत्पादक व मान्यताप्राप्त विक्रेते यांची माहिती , आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी आवश्यक असलेले शेडनेट , मल्चिंग पेपर बाबत अचूक माहिती व त्याचे वापराचे तंत्रज्ञान , पॉलिहाऊस ची उभारणी व त्याबाबत संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान , यांचे सर्व उत्पादक, सेवा पुवठादार , व मान्यताप्राप्त विक्रेते यांची माहिती. शेतीसाठी आवश्यक आधुनिक मशिनरी , त्यांचे योग्य त्या मॉडेल सह सर्व उत्पादक, सेवा पुवठादार , व मान्यताप्राप्त विक्रेते यांची माहिती. शेतमालावर अत्याधुनिक पद्धतीने काढणीपश्चात प्रक्रिया यांची माहिती, प्रक्रिया करणारे कारखानदार , साठवणुकीसाठी सर्व सुविधायुक्त कोल्ड स्टोरेज , निर्यातदार , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उपलब्ध बाजारपेठ , आधुनिक प्याकेजिंगची माहिती , त्याचे सर्व उत्पादक, सेवा पुवठादार , व मान्यताप्राप्त विक्रेते यांची माहिती अशी सर्वांगीण मदत संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना करते.
  • शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सरकारी योजना , पीकविमा , शेती विषयक अभ्यास दौरे तसेच स्थानिक , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शेती प्रदर्शने , परिसंवाद , चर्चासत्र ,यांची अचूक माहितीसह त्याचे ठिकाण , आयोजक , प्रायोजक , व्यवस्थापन या बाबत परिपूर्ण माहिती व मदत संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना करते.
  • दररोज आपल्या विभागातील पुढील सात दिवसांचा हवामानाचा अंदाज व आपल्या सोयीच्या ठिकाणच्या शेतमाल विक्री बाजारपेठेतील बाजारभाव याबाबत चे मेसेजेस संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना पाठविते.
  • सभासद शेतकरी बंधूंसाठी व्हाट्सअप सुविधेत आपल्या पिकावरील समस्या व इतर फोटो बघून त्यानुसार योग्य तो सल्ला व मार्गदर्शन केले जाते. तसेच शेतीविषयक ऑडियो सल्ला दिला जातो.
  • आपल्या विभागात पिकांच्या सिझन नुसार योग्यवेळी पीक परिसंवाद चे व शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना करते.
  • सभासद शेतकरी बंधूंसाठी संस्थेच्या " कृषिसेवा- अन्नदाता " हया मोबाइल अ‍ॅपवर सर्व पिकांची सर्वांगीण माहिती , शेतीविषयक बातम्या, सर्व प्रकारचे व आपल्या जवळचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र व त्यांच्याकडील उपलब्ध उत्पादने तसेच शेती उपयोगी साहित्य , त्यांचे भाव, यांची माहिती, तसेच शेतकरी बंधूंची तालुका, जिल्हा, व पीकनिहाय एकूण लागवडीखालील क्षेत्र याबाबत माहिती उपलब्ध आहे.
  • संस्था स्वतः सर्वे करून आपल्या विभागातील स्टॅंडर्ड खते, औषधे , बियाणे ,ड्रीप यांचे विक्रेते , रोपवाटिका, शेतीविषयक सेवा पुरवठादार , शेती विषयक मशिनरी, औजारे यांचे विक्रेते, स्टॅंडर्ड सुविधायुक्त कोल्डस्टोरेज , निर्यातदार याना संस्था संस्थेने स्वतः निश्चित केलेल्या निकषानुसार मान्यता देईल , त्यांच्या दुकानात तसेच कार्यालयात दर्शनी जागेवर संस्थेने त्यांना स्वतःच्या सही शिक्क्याचे दिलेले प्रमाणपत्र लावेल. त्यामुळे संस्थेच्या सभासद बंधूना त्या दुकानावर , रोपवाटिकेवर , किंवा सेवापुरवठादारावर निसंकोच पने विश्वास ठेऊन त्यासोबत आपला खात्रीपूर्वक व्यवहार करता येईल.
 

मग शेतकरी बंधुनो आता जास्त विचार न करता करा आपल्या विश्वासू तज्ज्ञ सल्लागारला फोन.. व्हा संस्थेचे सभासद .

आपला विश्वासू तज्ज्ञ सल्लागार आपल्या सेवेसाठी एका फोनवर आपल्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध आहे. फोन नंबर. ८०१०२४९२४९ ( फोन लागल्यानंतर शेती विषयक माहितीसाठी १ दाबा )